संपर्क : 94200 94243

.

aa-logo

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस

एकता आंतरसमूह

(दक्षिण मराठवाडा विभाग)

बीड | हिंगोली | लातूर | नांदेड | उस्मानाबाद | परभणी


ही तुमची किंवा तुमच्या कुटुंबियांची समस्या झाली आहे काय ?

खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वत:लाच, अत्यंत प्रामाणिकपणे द्या. जर सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर आपल्या सहका­ऱ्याच्या किंवा घरातील अन्य व्यक्तींच्या सहाय्याने पुन्हा उत्तरे द्या.

'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस'ची प्रस्तावना

  'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' म्हणजे निनावी मद्यपी. ही पुरुष व स्त्रियांची एक संघटना आहे. ह्यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात की, ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा स्फुरते. अशा तऱ्हेने सभासद आपले स्वत:चे तसेच एक दुस­ऱ्याचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दूर राहतात.

  या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे की, मद्यपाशाच्या आजारातून मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहिजे. संघटनेत सामील होण्यास कोणतीही वर्गणी आकारली जात नाही. ही संघटना कुठलाही धर्म किंवा सामाजिक अथवा राजकीय तत्वांचा प्रचार करीत नाही. इतर कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय पक्षांशी ह्या संघटनेचा संबंध नाही.

  संघटनेचे ध्येय एकच आहे की, 'मद्यापासून स्वत:ला दूर ठेवणे आणि इतर मद्यपीडीत लोकांना ज्यांना दारूपासून मुक्ती मिळविण्याची इच्छा आहे त्यांना मदत करणे.'

'मद्यपाश' आजार

  20 व्या शतकात एक फार महत्वाचा शोध लागलेला आहे. तो म्हणजे 'व्यसनाधिनता हा एक कधीही न दुरूस्त होणारा मानसिक आजार आहे.' शंभर माणसे जर दारु पित असतील तर साधारणपणे पंधरा ते अठरा जणांना हा आजार होतो. हे निदर्शनास आले आहे.


'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' च्या सुधारणेच्या बारा पायऱ्या

  1. आम्ही मान्य केले आहे की मद्यशक्तीपुढे आम्ही हतबल आहोत, आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे.
  2. आम्हास समजले की आमच्याहून महान शक्तीच आम्हास सुरळीत करू शकेल.
  3. आम्ही निर्णय घेतला की आमची ईच्छाशक्ती व जीवन संपूर्णपणे परमेश्वरास सोपवून द्यावे.

'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस'च्या सभासदाचा एक अनुभव...

  ... हळूहळू-हळूहळू 'शानदार ड्रिंक्स घेणे' ची जागा 'दारू ढोसणे' ने कधी घेतली हे मला कळले सुद्धा नाही. घरातली, समाजातली माझी प्रतिमा बिघडत चालली होती. दारूच्या अजगराचा विळखा माझ्याभोवती दिवसेंदिवस घट्ट व्हायला लागला. जीव गुदमरायला लागला. कुणाला काय बोलावं हे कळेना, मला काय होतंय हे ही कळेना. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असं सर्व घडत असताना हे दारूमुळे घडतंय असं मला कधीही जाणवत नव्हतं. माझे प्रश्न वेगळे आहेत, माझ्या समस्या वेगळ्या आहेत असंच मला सारखं वाटायचं. 'मी दारु पीत नाही तर मी 'ड्रिंक्स' घेतो' असा माझा समज होता. 'दारुडे' वेगळे आणि मी वेगळा माणूस आहे असं मला वाटायचं. 'दारूडे' म्हणजे देशी दारुच्या दुकानासमोर दारू पिऊन वाकडे-तिकडे पडलेले, बायकोचे दागिने-घरातली भांडी विकून दारू पिणारे म्हणजे 'दारूडे' अशी माझी समजूत होती. पण 'दारूडा' या शब्दाची व्याख्या कळायला मला बरंच कांही बघावं लागलं, सोसावं लागलं...

नवागताचे प्रश्न

  प्रथमच ए. ए. संघटनेत येणाऱ्यांसाठी हे माहिती पत्रक आहे. नवीन येणाऱ्या व्यक्तीच्या मनात असलेले प्रश्न – जे आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आमच्याही पुढे उभे होते – सोडवण्याचा प्रयत्न येथे करीत आहोत.


  1. मी मद्यपी किंवा दारुडा आहे का?
  2. परत-परत इच्छेपेक्षा जास्त तुम्ही पित असाल, पिण्यामुळे वारंवार अडचणीत येत असाल, प्यालानंतर बऱ्याच वेळा विस्मरण होत असल्यास, आपण मद्यपी, दारुडे, शराबी, किंवा अल्कोहोलिक असू शकता.

    परंतु हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. ए. ए. मधील कोणीही तुम्हाला तुम्ही मद्यपी आहात किंवा नाही हे सांगणार नाहीत.


  3. माझ्या पिण्याबद्दल मला काळजी वाटते , तरी मी काय करावे...

'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' काय करते व काय करत नाही?

  ज्या लोकांना दारू पिण्याची समस्या भेडसावते आहे किंवा अशी समस्या असणाऱ्या अगर असण्याची शक्यता भासत असलेल्यांच्या संपर्कात जे आहेत, अशा लोकांसाठी ही माहिती आहे. ह्या पैकी बहुतेक माहिती ए.ए. जागतिक सेवा ह्या संस्थेद्वारा प्रकाशित साहित्यात विस्तृत स्वरूपात उपलब्ध आहे. शिफारस केलेल्या पुस्तिका आणि मार्गदर्शनपर सूचना मागील पानावर दिल्या आहेत. त्या आपल्याला सांगतील की अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस कडून आपण कशाची अपेक्षा करु शकता. ह्यातून आपल्याला कळेल की ए.ए. म्हणजे काय? ए.ए. काय करते? ए.ए. काय करत नाही?


'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' (ए.ए.) तुमच्यासाठी आहे का ?

  तुम्हाला ए. ए. मध्ये येऊन प्रयत्न करावयाचा आहे का? किंवा ए. ए. तुम्हाला मदत करू शकेल असे तुम्हाला वाटते का? हे फक्त तुम्हीच ठरूवू शकता. ए. ए. मधील आम्ही, ए. ए. मध्ये आलो कारण सरतेशेवटी आम्ही नियंत्रीत मद्यपान करण्याचा प्रयत्न सोडून दिला...

  ...आम्ही पुढे दिलेल्या काही प्रश्नांचे 'प्रामाणिकपणे" उत्तर देण्याचा प्रयत्न केला. जर चार किंवा अधिक प्रश्नांचे उत्तर होय असेल तर आमची मद्यपानाची समस्या गंभीर स्वरूपाची असेल. तुम्ही प्रयत्न करून पहा. लक्षात ठेवा की मला मद्यपानाची समस्या आहे ह्या सत्याला सामोरे जाण्यात काहिच लाजिरवाने नाही...

'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' च्या दक्षिण मराठवाड्यातील नियमित सभा

aa-logo

व्हिडीओज

Satyamev Jayate - Alcohol Abuse - Alcoholism is a disease



व्यसनमुक्तीच्या कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सन्मान




विनामुल्य मदतीसाठी संपर्क

94200 94243


ईमेल

aaektaintergroup@gmail.com


External Websites